Posts

Showing posts from June, 2022

पतिता, ये चल शुचिं व्हायाला

१ पतिता, ये चल शुचिं व्हायाला, प्रभु येशुपदास धरीं, अधसिंधूमधुनि तारायाला प्रभु येशु कृपाच तरी धु. प्रभुच्या... प्रभुच्या... प्रभुच्या धर वंद्य पदा जगदुद्घारक गुरूराजाच्या न दुजा पथ मुक्तिपदा २ प्रभु येशु क्षितीवरि आला या, बघ तोचि समर्थ सखा, अधपाशा झडकरी तोडाया तुज देईल नित्य सुखा ३ म्हणवी तो पतितसखा, देई अधमुक्ति विनम्र जनां म्हणुनी तू शरण तया जाई प्रभु देईल शांति मना ४ मनुजांच्या हरि अवघ्या तापा प्रणतीं करूणा करितो , प्रभुपाशी चल त्यजुनी पापा शरणगततारक तो पंडिता रमाबाई

कोण मित्र येशुवाणी

     प्रिय मित्र येशू १ कोण मित्र येशुवाणी, सारे ओझे वाहाया ?    सर्व दुःखे तो ऐकूनी, साह्य करि सोसाया;    त्याकडे कधी न जातां, आम्ही अवमानितो    शांती खरी हरवुनी, शोक किती करितो | २ मोह असले कि चिंता, कांहि दिसे त्रासाया,    धैर्य नच सुटू देतां जा प्रभुला सांगाया    सर्व दुबळ्यांस पाहे, चित्तवृत्ति जाणतो    मित्र प्रिय असा आहे, हात धरी म्हणतो | ३ कष्टि जरी श्रमलेले, खांब जड वाहाया,    त्यासही उपाय केले, जा प्रभूला सांगाया    मित्र जरी तुच्छ मानी, जा प्रभूला सांगाया    तोचि सखा स्वर्गाहूनी, सिद्ध अंगीकाराया | मेरी इ. बिसल

येशूच्या रक्ते भरलें

१ येशूच्या रक्ते भरलें    धुण्याचे कुंड जाण,    जे पापी त्यांत घातले    ते होती शुद्ध प्राण । २ तो खांबी मरणारा चोर    त्यामुळे हर्षला,   तेणेंचि माझा दोष घोर   पुसेल सगळा । ३ हे प्रभु तुझे रक्तमोल   कधीं न संपणार   देवाचें सर्व प्रिय कूळ   तू तेणे खंडणार । ४ हा रक्त ओघ वाहतां   मी भावें पाहीला,   तेथूनी स्तुति करीता   उद्धार गाईला । ५ मी ह्या जगांत राहतां   करीन स्तवने,   व प्राण अंती सोडिता   अनंत गायनें । एच. बॅलन्टाइन

आनंद झाला आनंद झाला

Marathi Christain Song lyrics आनंद झाला आनंद झाला राजा येशूचा जन्म झाला --(2) बोला येशूचा जन्म कशाला झाला --(4) पापांपासून मुक्ती देण्यास झाला 1. मरियेला मोठा अनुग्रह झाला --(2) दाविद नगरात जल्लोष झाला --(2) शांतीचा राजा आला रे आला राजा येशूचा जन्म झाला --(2) आनंद झाला......... 2. बेथलेहेमात येशू जन्मास आला --(2) कुवारीच्या गर्भी येशू जन्मास आला --(2) यहुदाचा सिंह आला रे आला  राजा येशूचा जन्म झाला --(2) आनंद झाला........ 3. (पवित्र) आत्याने येशू जन्मास आला --(4) राजांचा राजा येशू जन्मास आला --(4) शैतानाचा नाश करण्यास आला राजा येशूचा जन्म झाला --(2) आनंद झाला........

तारणारा तो जन्मला आहे

Marathi Christain Song lyrics तारणारा तो जन्मला आहे तारणारा तो जन्मला आहे --(2) 1. अंबरी रोज असंख्य तारे लखलखती आहेत सारे --(2) आज नवखा तो पूर्वेला आहे --(2) तारणारा तो........ 2. आज गव्हाणीच्या हो दारी मेंढपाळांचा कळप भारी --(2) मागी लोकांचा काफीला आहे --(2) तारणारा तो......... 3. चुंबण्यास धरतीच्या ओठी येशू बाळास पांघरण्यासाठी --(2) स्वर्ग किंचित वाकला आहे --(2) तारणारा तो जन्मला आहे तारणारा तो जन्मला आहे 

वंदन आमूचे ख्रिस्त तुला

Marathi Christain Song lyrics वंदन आमूचे ख्रिस्त तुला  जय बाळा तुला प्रणाम --(2) 1. पूर्वे दिशेला तारा उगवला आनंद झाला मागी लोकांना --(2) चमकुनी सांगे तारा हा जगाला  जय बाळा तुला प्रणाम 2. पाळुया आपण एक जुटीने  आनंद करूया सर्व मिळूनी --(2) सुखाची जावो ख्रिस्त जयंती जय बाळा तुला प्रणाम

कोणी नसे कुणाचा

Marathi Christain Song lyrics कोणी नसे कुणाचा बंधु सखा रे आपुला कोणी नसे कुणाचा, बंधु सखा रे आपुला --(3) 1. कैसा करू भरोसा या आप्त मंडळीचा, सर्व सुखाचे साथी कोनी नसे कुणाचा, येताच संकटे ही सोडीती साथ आपुला --(2) खोटे हे सर्व नाते प्रभु एकलाची आपुला --(2) कोणी नसे कुणाचा......... 2. घम हा तुझा रे जीवा आला कसा कळेना, परके हे सारे वेड्या मन के आपुले जाला, आभास हा सुखाचा निर्माण तूच केला --(2) खोटे हे सर्व नाते प्रभु एकलाची आपुला --(2) कोणी नसे कुणाचा ......... 3. चल रे जीवा तु आता दोघे मिळूनी जाऊ, ना सोबती ना साथी आई ना बाप भाऊ, सुख दुख आयुष्याचे कंठवायाचे तुझला --(2) खोटे हे सर्व नाते प्रभु एकलाची आपुला --(2) कोणी नसे कुणाचा........ 4. देवा मला दे आता, तव हात आसर्याचा, सोडू नको तू मझला, आधार तूच माझा, तू घातले सजन मी लावी आता तिरला --(2) खोटे हे सर्व नाते प्रभु एकलाची आपुला --(2) कोणी नसे कुणाचा........

आसवांना कळेना

Marathi Christain Song lyrics आसवांना कळेना मोल माझ्या प्रभूचे --(2) तो दमला, तो थकला, माझ्यासाठी सुळी गेला --(2) 1. ऐकली ना कोणी त्रूषार्थ त्याची वाणी --(2) पाहिली ना कोणी अघोर वेदना ही तो दमला, तो थकला, माझ्यासाठी सुळी गेला --(2) आसवांना कळेना मोल माझ्या प्रभूचे --(2) तो दमला, तो थकला, माझ्यासाठी सुळी गेला --(2) 2. धगधगत्या ऊन्हात एकटाच तो --(2) क्रुसासी टांगलेला निष्पाप कोकरा तो तो दमला, तो थकला, माझ्यासाठी सूळी गेला --(2) आसवांना कळेना मोल माझ्या प्रभूचे --(2) तो दमला, तो थकला, माझ्यासाठी सुळी गेला --(2)

फुलती कळी म्हणाली

फुलती कळी म्हणाली  फुलण्यात अर्थ नाही फुलताच लोक तुडवी डोळ्यांत येते पाणी 1. माणूस माणसाला  येथेना कोणी उरणार  पशू तुल्य माणसाला  जगण्यात अर्थ नाही. 2. ख्रिस्ती ख्रिस्ती म्हणूनी अभिमान बाळगावे  नामधारी ख्रिस्ती म्हणूनी जगण्यात अर्थ नाही 3. जथे नसे प्रभूची  स्तुती खरे पणाची  सोडूनी काम आपूले  बसण्यात अर्थ नाही

आहे कुणाला खात्री उद्याची

आहे कुणाला खात्री उद्याची उद्या काय होइल कळनार नाही संधि अशी रोज येनार नाही येनार नाही आहे कुणाला खत्री उदयची १) जरी लाड केले या देहास जपले पापामध्ये सांग रे कोण तरले समजुं घे आज इच्छा प्रभुची कोणी तुझ्या काम येनार नाही येनार नाही आहे कुणाला खत्री उदयाची 2. तुला रे कुणाचा आधार नाही पापी जिवाचा या उद्धार नाही करशील जरी आज नकार प्रभुचा उद्या तो तुला जवळ घेनार नाही घेणार नाही आहे कुणाला खात्री उड्याची 3) पसरुनी हात उभा टांगला तो माझ्याकडे या प्रेमाने म्हणतो आहे उगाची मैत्रे जगाची जग हे तुला शांती देनार नाही देनार नाही आहे कुणाला खात्री

आज येशूचा तू स्विकार कर

Marathi Christain Song lyrics ओल्या मातीचा तू एक साचा,  तुझ्या देहाचा नाही भरवसा --(2) नको देउ हवाला उद्याचा आज येशुचा स्वीकार कर,  पश्चाताप कर मानवा --(2) पश्चाताप कर मानवा --(2) 1. पातकात वाटते मजा,  भोगशील तू पुढे सजा --(2) पश्चातापे शरण प्रभुला जा --(2) सुधर जरा पापी मानवा --(2) आज येशुचा ........... 2. शुद्ध करेल रक्त येशुचे,  मुक्त करेल रक्त येशूचे --(2) राहो आज स्मरण येशूचे --(2) जाईल जन्म वाया मानवा --(2) आज येशुचा स्वीकार कर,  पश्चाताप कर मानवा --(2) पश्चाताप कर मानवा --(2)

प्रीती तुझीच स्मरावी

अनमोल या प्रितीला --(2) कवटाळूनी धरावे प्रीती तुझीच स्मरावी ह्रदयात साठवावी --(2) 1. देवाने या जगावर अनमोल केली प्रीती  धाडीला पुत्र जगती जोडावयास नाती प्रभू येशूचा प्रीतीची --(2) आठवण सदा करावी प्रीती तुझीच स्मरावी ह्रदयात साठवावी --(2) अनमोल या प्रीतीला......... 2. प्रभु येशूचा प्रमाण वधस्तंब हे निशाण आम्हा पापीयांच्यासाठी देला क्रूसावरी प्राण राजाचा रंक झाला --(2)  पाप्याची मान मिळाली प्रीती तुझीच स्मरावी ह्रदयात साठवावी --(2) अनमोल या प्रीतीला......

हा दिवस प्रभूचा आहे

हा दिवस प्रभूचा आहे उल्हास व आनंद करू --(2) किती थोर तो देव सर्वस्व आपणांस दिले --(2) तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानयुग आहे --(2) हा.. हा.. हा.. हा.. हाल्लेलुया हो.. हो.. हो.. हो.. होसान्ना --(2) हाल्लेलुया… हाल्लेलुया…हाल्लेलुया --(2) 2. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू --(2) स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ --(2) तारक तो सामर्थ्य..... 3. त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे --(2) सैतानी बंधनातूनी आपणांस सोडवितो --(2) तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानयुग आहे --(2) हा.. हा.. हा.. हा.. हाल्लेलुया हो.. हो.. हो.. हो.. होसान्ना --(2) हाल्लेलुया… हाल्लेलुया…हाल्लेलुया --(2)

निवडिले आहे मी तुला

निवडिले आहे मी तुला --(2) देव मोसेस हे बोलला .....(4) 1. अग्नि रुपाने दिले दर्शन नमवूनी माथा करितो नमन --(2) अग्नि द्वारे प्रभु बोलला --(2) देव मोसेस हे बोलला --(4) 2. इस्रायालाचा अधिपति होशील कळप हा माझा तू पाहशील --(2) मी आहे तुझ्या जोडीला --(2) देव मोसेस हे बोलला --(4) 3. जळबुठांचा जळजिभेचा असशील जर तू भक्त देवाचा --(2) उने पडणार नाही तुला --(2) देव मोसेस हे बोलला --(4) निवडिले आहे मी तुला .... (2) देव मोसेस हे बोलला ..... (4)

चला चला जाऊ lyric Marathi Christmas Song

चला चला जाऊ lyric  Marathi Christmas Song चला चला जाऊ, जगाचा उद्धारक पाहू  परमोच्चावर गौरव शांती  ह्या धरणीवरती, कृपा नरावर, परमोत्साहे  देवदूत गाती. प्रतिध्वनीने ग्रह हे सारे  व्योमी द्न्दणती: चला गीत हे  आपण ही गाऊ चला चला जाऊ, जगाचा उद्धारक पाहू  भविष्यवादी स्वर्गी सारे  लागती नाचाया, साधे भोळे मेंढपाळही  लागती धावाया पुर्वेकडूनी साधू निघाले  प्रभूला भेटाया, चला दर्शना  आपणही जाऊ चला चला जाऊ, जगाचा उद्धारक पाहू  प्रीती आली देह धरोनी  आम्हा ताराया, हस्त धरोनी मृतास आम्हा पुनरपि उठवाया, जय जय येशु ह्या मधुघोषे भुवना व्यापाया; प्रभूला हृदयी साठवूनी घेऊ चला चला जाऊ, जगाचा उद्धारक पाहू 

आधी वंदन देवा तुला

आधी वंदन देवा तुला तू आहे जगा वेगळा नाम येशूचे गोड मनाला मुखी घेऊ सदा स्तवनाला किती आळवू मी देवा तुला किती आळवू मी ख्रिस्ता तुला तू आहे जगा वेगळा नाम येशूचे सांगू जगाला ख्रिस्त येशू हाची तारणारा पापी जनांना तारावयाला तू आहे जगा वेगळा

राजा येशू आला

राजा येशू आला । राजा येशू आला ॥ सैतानाला जिंकायाला, । राजा, येशू आला घालवुनी पापें । णि दुःखें घोर ॥ पूर्ण शांती द्यावयाला, । राजा येशू आला आनंदी आनंद । झालों पापमुक्त ॥ मला शुद्ध करायाला, । राजा येशू आला वधस्त्तंभावरी । प्राण देता झाला । जगताचा त्राता झाला, । राजा येशू आला राजांचा तो राजा । प्रभूंचा तो प्रभु ॥ बोला सारे जयजय बोला, । राजा येशू आला !

येशू माझा मेंढपाळ

येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कूरणात आम्हाला चारीतो...(२) सुंदर डोंगरावरूनी नेतो ओ...हो...हो... मंजूळ झरण्याचे पाणी पाजतो ओ...हो...हो...(२) येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कूरणात आम्हाला चारीतो...(२) मार्गात रक्षण आमुचे करतो ओ...हो...हो... सैतानापासून दूर ठेवतो ओ...हो...हो...(२) येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कूरणात आम्हाला चारीतो...(२) भिणार नाही आम्ही आता कूणाला ख्रिस्तच आहे अमुच्या संगतीला...(२) येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कूरणात आम्हाला चारीतो...(३) हाल्लेलुया आमेन...(४) येशू माझा मेंढपाळ ... आमेन आम्ही त्याची मेंढरे ... आमेन हिरव्या कूरणात ... आमेन आम्हाला चारीतो...

देवाच्या भेटीसाठी

देवाच्या भेटीसाठी  मी तळमळतो अंतरी अपार तळमळतो अंतरी...॥२॥ देवाच्या भेटीसाठी... तृषित हरिणी जशी तळमळे पाण्याच्या ओघासाठी तसाच माझा जीव तळमळे देवा तव भेटीसाठी देवाच्या भेटीसाठी  मी तळमळतो अंतरी अपार तळमळतो अंतरी देवाच्या भेटीसाठी माझा जीव देवासाठी पहा किती हा तान्हेला दर्शन देवाचे मज केव्हा घडेल ऐसे होई मला देवाच्या भेटीसाठी  मी तळमळतो अंतरी अपार तळमळतो अंतरी देवाच्या भेटीसाठी मना खिन्नता तू झालासी कशास ऐसा तळमळशी सोडू नको रे धीर मना तू देईल दर्शन तो तुजसी देवाच्या भेटीसाठी  मी तळमळतो अंतरी अपार तळमळतो अंतरी देवाच्या भेटीसाठी देव परात्पर करील दिवसा अपुल्या वात्सल्या प्रकट जीवन दात्या माझ्या प्रभू चे रात्री गाईन मी गित देवाच्या भेटीसाठी  मी तळमळतो अंतरी अपार तळमळतो अंतरी देवाच्या भेटीसाठी विसरलास तो मजला ऐसे विचारीन मी देवाला वैर्याच्याजाचा मी पिढलो शोकवस्र हे अंगाला देवाच्या भेटीसाठी  मी तळमळतो अंतरी अपार तळमळतो अंतरी देवाच्या भेटीसाठी कोठे तुझा आहे देव असे मला शत्रू म्हणती निंदा माझी सदा करिती हृदया माझ्या दुःखविती देवाच्या भेटीसाठी  मी तळमळतो अंतरी अप...

सुवंदित हो नाम प्रभूचे

सुवंदित हो नाम प्रभूचे सुवंदित प्रभूराया सुवंदित हो नाम...॥२॥ अर्पण करितो भाकर जी ती आहे तुझीच माया...॥२॥ तुझ्या कृपेने भाकरीत त्या पोसू दे आमुची काया सुवंदित हो नाम प्रभूचे सुवंदित प्रभूराया सुवंदित हो नाम...॥धृ॥ द्राक्षवेलीचा उपज अर्पितो प्रभू ही तुझीच किमया...॥२॥ आम्हासाठी पेय बनावे आध्यात्मिक हे राया सुवंदित हो नाम प्रभूचे सुवंदित प्रभूराया सुवंदित हो नाम...॥२॥

राजा येशू आला

राजा येशू आला...(४) सैतानाला जिंकायाला राजा येशू आला...(२) राजा येशू आला...(४) सैतानाला जिंकायाला राजा येशू आला...(२) घालवूनी पापे आणि दुःखे घोर...(२) पुर्ण शांती द्यावयाला राजा येशू आला...(२) राजा येशू आला...(४) सैतानाला जिंकायाला राजा येशू आला...(२) आनंदी आनंद झालो पापमुक्त...(२) मला शुद्ध करायाला राजा येशू आला...(२) राजा येशू आला...(४) सैतानाला जिंकायाला राजा येशू आला...(२) वधस्तंभावरी प्राण देता झाला...(२) जगताचा त्राता झाला राजा येशू आला...(२) राजा येशू आला...(४) सैतानाला जिंकायाला राजा येशू आला...(२) राजांचा तो राजा प्रभूंचा तो प्रभू...(२) बोला सारे जय जय बोला राजा येशू आला...(२) राजा येशू आला...(४) सैतानाला जिंकायाला राजा येशू आला...(४)

परमेश्वर मेंढपाळ माझा

परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती दिवसरात्र माझ्या सांगाती मजवर त्याची प्रीती...(२) हिरव्या कुरणी नेतो मजला प्रेमे मजला चरवीतो...(२) ओढ्याचे मज देतो पाणी माझ्या जीवा फुलवितो परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती दिवसरात्र माझ्या सांगाती मजवर त्याची प्रीती...॥धृ॥ आपुल्या नावासाठी देव सत्यपथाने मज नेतो...(२) अरिष्टातुनी वाचवितो मज माझ्या जीवाला जपतो परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती दिवसरात्र माझ्या सांगाती मजवर त्याची प्रीती...(२) मजवर त्याची प्रीती...(२)

देवा तुझ्या दयेची

देवा तुझ्या दयेची मज लागली तहान तुझ्या कृपेचा भुकेला दे खावयास अन्न देवा तुझ्या दयेची मज लागली तहान...॥धृ॥ प्रभु तूच मेंढपाळ माझा करी सांभाळ...(२) विश्वास करण्या मजला दे विश्वासाचे दान...(२) देवा तुझ्या दयेची मज लागली तहान...॥धृ॥ शिकविले प्रीती करण्या शांतीचे जीवन जगण्या...(२) दे शांती प्रीती मजला तू जीवनाची खाण...(२) देवा तुझ्या दयेची मज लागली तहान तुझ्या कृपेचा भुकेला दे खावयास अन्न देवा तुझ्या दयेची...

पित्या आमुच्या तू स्वर्गी

पित्या आमुच्या तू स्वर्गी तुझे आम्ही रे आभारी...॥२॥ नाव थोर हो सदा तुझे धरती वरती राज्य तुझे येवो आम्हा वाटत असे हीच मनिषा रे अमुची पित्या आमुच्या तू स्वर्गी तुझे आम्ही रे आभारी...॥२॥ तव इच्छेने स्वर्ग हसे पृथ्वीवरती हास्य तसे वदना वदनावरी दिसावे वाटतसे रे आम्हासी पित्या आमुच्या तू स्वर्गी तुझे आम्ही रे आभारी...॥२॥ मिळो भाकरी आम्हा रोजची क्षमा दुज्यांच्या अपराधांची जशी करितो तशी करावी क्षमा आमुच्या पापांची पित्या आमुच्या तू स्वर्गी तुझे आम्ही रे आभारी...॥२॥ मोह न व्हावा आम्हा कशाचा लाभ घडावा सुसंगतीचा वाईटापासूनी बचाव व्हावा प्रभो मागणे हे आमुचे पित्या आमुच्या तू स्वर्गी तुझे आम्ही रे आभारी...॥४॥

गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची

गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचुनी गाऊया...(४) हालेलुया... हालेलुया... हालेलुया... हालेलुया...(२) येशूची प्रीती किती महान माझ्या पापांसाठी केले बलिदान...(४) हालेलुया... हालेलुया... हालेलुया... हालेलुया...(२) येशूचे रक्त किती महान पापांच्या खाचेतून सोडविते...(४) हालेलुया... हालेलुया... हालेलुया... हालेलुया...(२) येशूची शक्ती किती महान सैतानी वारेतून सोडविते...(४) हालेलुया... हालेलुया... हालेलुया... हालेलुया...(२) 

धन्यवाद येशूला

धन्यवाद येशूला...(४) आलेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला...(२) महिमा हो द्या त्याला...(४) आलेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला...(२) गौरव द्या त्याला...(४) आलेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला गौरव द्या त्याला...(२) धन्यवाद येशूला...(४) आलेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला...(२) ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार...(२) ज्या ज्या वेळी ,होते दुःख करिता धावा देतो सुख...(२) ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार...(२) काय सांगू त्याचे प्रेम देतो वारंवार क्षेम...(२) ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार...(२) मला वाटे प्रिय फार...(२)

देवा मला क्षमा कर

देवा मला क्षमा करी आलो पापी तुझ्या दारी...(२) तुचि अनंत करूणा दयेने ऐक प्रार्थना याचना देवा मला क्षमा करी आलो पापी तुझ्या दारी डोळे माझे दान तुझे केली पापे डोळ्यानी मी जीभ माझी दान तुझे केली पापे शब्दांनी मी तुचि अनंत करूणा दयेने ऐक प्रार्थना याचना देवा मला क्षमा करी आलो पापी तुझ्या दारी हात माझे दान तुझे केली पापे कृत्यांनी मी बुद्धी माझी दान तुझे केली पापे विचारांनी मी तुचि अनंत करूणा दयेने ऐक प्रार्थना याचना देवा मला क्षमा करी आलो पापी तुझ्या दारी आलो पापी तुझ्या दारी...(२)

मी कुठे ही कसा ही असो

christainsonglyric मी कुठे ही कसा ही असो ख्रिस्त माझ्या मधे तो दिसो...॥२॥ ख्रिस्त माझ्या मधे तो दिसो...॥२॥ मी कुठे ही कसा ही असो ख्रिस्त माझ्या मधे तो दिसो...॥२॥ मृत्यू छायेतूनी चालता मी असावे स्मरूनी तुला...॥२॥ जिंकुनी मृत्यूला जो उठें जिंकुनी मृत्यूला जो उठें तो प्रभू नेत्री माझ्या दिसो मी कुठे ही कसा ही असो ख्रिस्त माझ्या मधे तो दिसो...॥२॥ पाप अंधार हा दाटला मी दिवा चेतवावा मनी...॥२॥ वचन तेजामध्ये उजळता वचन तेजामध्ये उजळता मार्ग नीतीचा मी दिसो मी कुठे ही कसा ही असो ख्रिस्त माझ्या मधे तो दिसो...॥२॥ बंधने या जगाची किती मुक्तीदाता परी येशु तू...॥२॥ हात या दुर्बलाचे प्रभू हात या दुर्बलाचे प्रभू जोडलेले तुझ्या पदी दिसो मी कुठे ही कसा ही असो ख्रिस्त माझ्या मधे तो दिसो...॥२॥ ख्रिस्त माझ्या मधे तो दिसो...॥२॥ मी कुठे ही कसा ही असो ख्रिस्त माझ्या मधे तो दिसो...॥धृ॥ ख्रिस्त माझ्या मधे तो दिसो...॥२॥

मी वेचिले फुलांना

मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले...(२) जखमी करूनी तुजला मला सर्व रे मिळाले मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले जखमी करूनी तुजला मला सर्व रे मिळाले...(२) हाती पायी खोल तुझिया रूतले खिळे दुधारी...(३) मी पाप मुक्त झालो मी पाप मुक्त झालो फटके तुला मिळाले जखमी करूनी तुजला मला सर्व रे मिळाले मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले...(२) जखमी करूनी तुजला मला सर्व रे मिळाले...(२) रूतला कुशीत भाला सरता संवेदना या...(३) मी रोग मुक्त झालो  मी रोग मुक्त झालो व्याधी तुला मिळाल्या जखमी करूनी तुजला मला सर्व रे मिळाले मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले...(२) जखमी करूनी तुजला मला सर्व रे मिळाले...(२) पाहुनी येशू तुजला  धिक्कारिले जगाने (३) मी भावे कृपा भरुनी मी भावे कृपा भरुनी  क्रूस हे तुला मिळाले जखमी करूनी तुजला मला सर्व रे मिळाले मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले...(२) जखमी करूनी तुजला मला सर्व रे मिळाले...(२) मला सर्व रे मिळाले

देवाचा महिमा वर्णावा

देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा  धन्यवाद देवाला द्यावा  धन्यवाद देवाला द्यावा (२) पापांची आम्हाला क्षमा करितो करुणा कृपेची वृष्टी करितो (२) सन्मार्गावरी आम्हाला चालवितो (२) देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा  धन्यवाद देवाला द्यावा  धन्यवाद देवाला द्यावा (१) रोज पहाटे आम्हाला जागवितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो (२) दिवसरात्र आम्हाला जपतो (२) देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा  धन्यवाद देवाला द्यावा  धन्यवाद देवाला द्यावा (१) उत्तम भाकर आम्हाला पुरवितो जीवनाचे जल आम्हाला पाजवितो (२) उत्तम आरोग्य आम्हाला देतो (२) देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा  धन्यवाद देवाला द्यावा  धन्यवाद देवाला द्यावा (२)

प्रभू ये सखया ये मम हृदयी

प्रभू ये सखया ये मम हृदयी (२) व्याकुळले मन माझे ये या जीवनी प्रभू ये सखया ये मम हृदयी  जीवन ज्योती तुची प्रभू  प्रिती मम जीवनाची (२) वन उपवनी प्रभू श्वास तुझे रे (२) श्वास तुझे रे (२) प्रभू ये सखया ये मम हृदयी (२) व्याकुळले मन माझे ये या जीवनी प्रभू ये सखया ये मम हृदयी  पाप तिमीर घनदाट जगी माणुसकी दुर्मिळ (२) दिपस्तंभ प्रभू होऊनी ये तु (२) होऊनी ये तु (२) प्रभू ये सखया ये मम हृदयी (२) व्याकुळले मन माझे ये या जीवनी प्रभू ये सखया ये मम हृदयी  वेशाचे तट तोड प्रभू  माणुस कर माणसा (२) प्रितीने जग फुलव प्रभू तु (२) फुलव प्रभू तु (२) प्रभू ये सखया ये मम हृदयी (२) व्याकुळले मन माझे ये या जीवनी प्रभू ये सखया ये मम हृदयी  संपत्तीची आस मनी नाती तुटती जगी (२) जीवन धन प्रभू होऊनी ये तु (२) होऊनी ये तु (२) प्रभू ये सखया ये मम हृदयी (२) व्याकुळले मन माझे ये या जीवनी प्रभू ये सखया ये मम हृदयी  आशा आमुची तुची प्रभू  मुक्ति या जीवनाची (२) शाश्वत भाकर होऊनी ये तु (२) होऊनी ये तु (२) प्रभू ये सखया ये मम हृदयी (२) व्याकुळले मन माझे ये या जीवनी प्रभू ये सखया ये मम हृदय...

सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती

सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती वल्हव रे माझी नाव ने किनारी (२) सुटला वारा जीवनाच्या सागरी आदळली रे नाव खडकावरी (२) तुजविना रे कोण आम्हा तारी तुजविना रे कोण आम्ही तारी वल्हव रे माझी नाव ने किनारी  सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती वल्हव रे माझी नाव ने किनारी (२) वादळ वार्यात प्रभू तुझा आधार तुजविना कोण आम्हा तारणार (२) आरोळी माझी पोहचो तुझ्या दारी  आरोळी माझी पोहचो तुझ्या दारी  वल्हव रे माझी नाव ने किनारी  सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती वल्हव रे माझी नाव ने किनारी (२) अथांग सागर तुफान लाटावरी दृष्टी असो तुझी प्रभू आम्हावरी (२) तुजविना रे कोण आम्हा कैवारी तुजविना रे कोण आम्हा कैवारी  वल्हव रे माझी नाव ने किनारी  सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती वल्हव रे माझी नाव ने किनारी (२)

आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला (२) मंदिर तुझे सुंदर पावन मंदिर तुझे सुंदर पावन  मनात अमुच्या तुझेच चिंतन  आलो तुझ्या दर्शनाला... आलो तुझ्या दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला (२) चरण पाहता तुझेच देवा  चरण पाहता तुझेच देवा  येई अर्थ अमुच्या जगण्याला आलो तुझ्या दर्शनाला... आलो तुझ्या दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला (२) सुमधूर सूर हे अमुचे देवा  सुमधूर सूर हे अमुचे देवा  सदैव करती तुझाच धावा  आलो तुझ्या दर्शनाला... आलो तुझ्या दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला (२) वाट पाहुनी थकले डोळे  वाट पाहुनी थकले डोळे  उत्तर दे तु अमुच्या हाकेला आलो तुझ्या दर्शनाला... आलो तुझ्या दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला (२) आलो तुझ्या दर्शनाला (३)

मी तुज बाप सदैव म्हणावे

मी तुज बाप सदैव म्हणावे बाप सदैव म्हणावे...(२) मी तुज बाप सदैव म्हणावे ख्रिस्तद्वारा लेकरू तव मी उमगुनि नित्य रमावे मी तुज बाप सदैव म्हणावे...(२) जिकडे-तिकडे मज भावंडे परके कोणी नसावे मी तुज बाप सदैव म्हणावे...(२) तव वत्साला साजे ऐसे शील मदीय असावे मी तुज बाप सदैव म्हणावे बाप सदैव म्हणावे मी तुज बाप सदैव म्हणावे

किती आनंद हा

ध्रु. किती आनंद हा, स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हां अति भरपूर तो, मती गुंग करितो वर्णन करण्या न पुरे जिव्हा १. धावत होतो वेगे, नाशाकडे मी जरी बोलावुनी मजला, दाविले प्रेम तरी २. मोडत असताना, मोडका माझा बोरू तू मज स्थिराविले, प्रेमे मध्यस्थी करून ३. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा पापाच्या दारीतूनी, वर काढिले मला ४. तुझी वाणी ऐकण्या, समय देशील का? हृदया टेकण्या हा, जीव अधीर झाला ५. येशील मेघांवरी, भेटण्या अंतराळी असे आनंदी आनंद, तेथे निरंतर आनंद ६. प्राणप्रिया पाहीन, जेव्हा तुझ्या सुमुखा मन्मन तळमळते, आतुर मी दर्शना

ईश्वराची दया

१. ईश्वराची दया किती! थांग तीचा लागेना; न्यायि, तरी त्याची प्रिती सिंधुएवढी जाणा. ध्रु. देव बोले प्रेमे फार, टांकि माझ्यावरी भार. २. सर्व कष्टी, सर्व दुःखी ओझियांनी कण्हती; येकूं जातें दिव्यलोकीं, प्रीती तेथें वसती. ३. देवं खरा ममताळू अंत कांही लागेना; केवढा तो कनवाळू माणसांना कळेना. ४. ती खरी अगाध प्रीती ती तयाच्या अंतरी; तोच म्हणे, ‘नाही भीती, मी दयासनावारी.’ ५. या, उदासी, भ्रांति सोडा, त्याचि वाणी ऐकुनी; निश्चला ती मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवूनी. ६. बापावरी टेंकतांना लेकरांना सुख फार, येशुपाशीं राहतांना हर्ष वाटतो अपार.

होईल वृष्टी कृपेची

होईल वृष्टी कृपेची (There shall be showers of blessing) १. होईल वृष्टी कृपेची ईशप्रेमोक्ती असे तेणे तृष्टी,पुष्टि यांची वृष्टी जगी होतसे ध्रु. वृष्टी कृपेची! वृष्टी कृपेची हवी बिंदू येताती दयेची-आम्हां सुवृष्टी हवी २. होईल वृष्टी कृपेची स्फूर्तिदायी थोर ती ये झोड भारी वारीची खिंडयाटेकाडांत ती ३. होईल वृष्टी कृपेची, देवा करावी आता स्वोक्ति करा स्वामी स्वाचि, द्या हर्ष अपेक्षिता ४. होईल वृष्टी कृपेची साधा प्रभू इष्ट काज ऐसे विनंती ख्रिस्ताचे नावे करीतसु आज