आधी वंदन देवा तुला
आधी वंदन देवा तुला
तू आहे जगा वेगळा
नाम येशूचे गोड मनाला
मुखी घेऊ सदा स्तवनाला
किती आळवू मी देवा तुला
किती आळवू मी ख्रिस्ता तुला
तू आहे जगा वेगळा
नाम येशूचे सांगू जगाला
ख्रिस्त येशू हाची तारणारा
पापी जनांना तारावयाला
तू आहे जगा वेगळा
Comments
Post a Comment