प्रीती तुझीच स्मरावी
अनमोल या प्रितीला --(2)
कवटाळूनी धरावे
प्रीती तुझीच स्मरावी ह्रदयात साठवावी --(2)
1.
देवाने या जगावर अनमोल केली प्रीती
धाडीला पुत्र जगती जोडावयास नाती
प्रभू येशूचा प्रीतीची --(2)
आठवण सदा करावी
प्रीती तुझीच स्मरावी ह्रदयात साठवावी --(2)
अनमोल या प्रीतीला.........
2.
प्रभु येशूचा प्रमाण वधस्तंब हे निशाण
आम्हा पापीयांच्यासाठी देला क्रूसावरी प्राण
राजाचा रंक झाला --(2)
पाप्याची मान मिळाली
प्रीती तुझीच स्मरावी ह्रदयात साठवावी --(2)
अनमोल या प्रीतीला......
Comments
Post a Comment