पित्या आमुच्या तू स्वर्गी
पित्या आमुच्या तू स्वर्गी
तुझे आम्ही रे आभारी...॥२॥
नाव थोर हो सदा तुझे
धरती वरती राज्य तुझे
येवो आम्हा वाटत असे
हीच मनिषा रे अमुची
पित्या आमुच्या तू स्वर्गी
तुझे आम्ही रे आभारी...॥२॥
तव इच्छेने स्वर्ग हसे
पृथ्वीवरती हास्य तसे
वदना वदनावरी दिसावे
वाटतसे रे आम्हासी
पित्या आमुच्या तू स्वर्गी
तुझे आम्ही रे आभारी...॥२॥
मिळो भाकरी आम्हा रोजची
क्षमा दुज्यांच्या अपराधांची
जशी करितो तशी करावी
क्षमा आमुच्या पापांची
पित्या आमुच्या तू स्वर्गी
तुझे आम्ही रे आभारी...॥२॥
मोह न व्हावा आम्हा कशाचा
लाभ घडावा सुसंगतीचा
वाईटापासूनी बचाव व्हावा
प्रभो मागणे हे आमुचे
पित्या आमुच्या तू स्वर्गी
तुझे आम्ही रे आभारी...॥४॥
Comments
Post a Comment