देवा मला क्षमा कर
देवा मला क्षमा करी
आलो पापी तुझ्या दारी...(२)
तुचि अनंत करूणा
दयेने ऐक प्रार्थना याचना
देवा मला क्षमा करी
आलो पापी तुझ्या दारी
डोळे माझे दान तुझे
केली पापे डोळ्यानी मी
जीभ माझी दान तुझे
केली पापे शब्दांनी मी
तुचि अनंत करूणा
दयेने ऐक प्रार्थना याचना
देवा मला क्षमा करी
आलो पापी तुझ्या दारी
हात माझे दान तुझे
केली पापे कृत्यांनी मी
बुद्धी माझी दान तुझे
केली पापे विचारांनी मी
तुचि अनंत करूणा
दयेने ऐक प्रार्थना याचना
देवा मला क्षमा करी
आलो पापी तुझ्या दारी
आलो पापी तुझ्या दारी...(२)
Comments
Post a Comment