येशूच्या रक्ते भरलें
१ येशूच्या रक्ते भरलें
धुण्याचे कुंड जाण,
जे पापी त्यांत घातले
ते होती शुद्ध प्राण ।
धुण्याचे कुंड जाण,
जे पापी त्यांत घातले
ते होती शुद्ध प्राण ।
२ तो खांबी मरणारा चोर
त्यामुळे हर्षला,
तेणेंचि माझा दोष घोर
पुसेल सगळा ।
त्यामुळे हर्षला,
तेणेंचि माझा दोष घोर
पुसेल सगळा ।
३ हे प्रभु तुझे रक्तमोल
कधीं न संपणार
देवाचें सर्व प्रिय कूळ
तू तेणे खंडणार ।
कधीं न संपणार
देवाचें सर्व प्रिय कूळ
तू तेणे खंडणार ।
४ हा रक्त ओघ वाहतां
मी भावें पाहीला,
तेथूनी स्तुति करीता
उद्धार गाईला ।
मी भावें पाहीला,
तेथूनी स्तुति करीता
उद्धार गाईला ।
५ मी ह्या जगांत राहतां
करीन स्तवने,
व प्राण अंती सोडिता
अनंत गायनें ।
करीन स्तवने,
व प्राण अंती सोडिता
अनंत गायनें ।
एच. बॅलन्टाइन
Comments
Post a Comment