सुवंदित हो नाम प्रभूचे
सुवंदित हो नाम प्रभूचे
सुवंदित प्रभूराया
सुवंदित हो नाम...॥२॥
अर्पण करितो भाकर जी ती
आहे तुझीच माया...॥२॥
तुझ्या कृपेने भाकरीत त्या
पोसू दे आमुची काया
सुवंदित हो नाम प्रभूचे
सुवंदित प्रभूराया
सुवंदित हो नाम...॥धृ॥
द्राक्षवेलीचा उपज अर्पितो
प्रभू ही तुझीच किमया...॥२॥
आम्हासाठी पेय बनावे
आध्यात्मिक हे राया
सुवंदित हो नाम प्रभूचे
सुवंदित प्रभूराया
सुवंदित हो नाम...॥२॥
Comments
Post a Comment