तारणारा तो जन्मला आहे
Marathi Christain Song lyrics
तारणारा तो जन्मला आहे
तारणारा तो जन्मला आहे --(2)
1.
अंबरी रोज असंख्य तारे
लखलखती आहेत सारे --(2)
आज नवखा तो पूर्वेला आहे --(2)
तारणारा तो........
2.
आज गव्हाणीच्या हो दारी
मेंढपाळांचा कळप भारी --(2)
मागी लोकांचा काफीला आहे --(2)
तारणारा तो.........
3.
चुंबण्यास धरतीच्या ओठी
येशू बाळास पांघरण्यासाठी --(2)
स्वर्ग किंचित वाकला आहे --(2)
तारणारा तो जन्मला आहे
तारणारा तो जन्मला आहे
Comments
Post a Comment