किती आनंद हा
ध्रु. किती आनंद हा, स्वर्गीय आनंद हा
प्रभू येशूने दिला आम्हां
अति भरपूर तो, मती गुंग करितो
वर्णन करण्या न पुरे जिव्हा
१. धावत होतो वेगे, नाशाकडे मी जरी
बोलावुनी मजला, दाविले प्रेम तरी
२. मोडत असताना, मोडका माझा बोरू
तू मज स्थिराविले, प्रेमे मध्यस्थी करून
३. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा
पापाच्या दारीतूनी, वर काढिले मला
४. तुझी वाणी ऐकण्या, समय देशील का?
हृदया टेकण्या हा, जीव अधीर झाला
५. येशील मेघांवरी, भेटण्या अंतराळी
असे आनंदी आनंद, तेथे निरंतर आनंद
६. प्राणप्रिया पाहीन, जेव्हा तुझ्या सुमुखा
मन्मन तळमळते, आतुर मी दर्शना
Comments
Post a Comment