Posts

हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो

हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो, । माझा आत्मा येशुकडे पाहात रहातो, ॥१॥ येशू तारितो हो मला येशु तारितो, यामुळेंच माझा जीव बहु आनंदतो ॥२॥ प्रेम दावितो हो, येशु प्रेम दावितो । प्रेमानेंच लहान थोरा तो बोलावितो. ॥३॥ प्रिय वाटतो हो, येशू प्रिय वाटतो, । माझे तन, मन, धन त्यास अर्पितो. ॥४॥

हा दिवस प्रभूचा आहे

Image
हा दिवस प्रभूचा आहे उल्हास व आनंद करू...(२) किती थोर तो देव सर्वस्व आपणांस दिले...(२) तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानयुग आहे...(२) हा.. हा.. हा.. हा.. हाल्लेलुया हो.. हो.. हो.. हो.. होसान्ना...(२) हाल्लेलुया... हाल्लेलुया... हाल्लेलुया...(२) चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू...(२) स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ...(२) तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानयुग आहे...(२) हा.. हा.. हा.. हा.. हाल्लेलुया हो.. हो.. हो.. हो.. होसान्ना...(२) हाल्लेलुया... हाल्लेलुया... हाल्लेलुया...(२) त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे...(२) सैतानी बंधनातूनी आपणांस सोडवितो...(२) तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानयुग आहे...(२) हा.. हा.. हा.. हा.. हाल्लेलुया हो.. हो.. हो.. हो.. होसान्ना...(२) हाल्लेलुया... हाल्लेलुया... हाल्लेलुया...(२)

जसा मी आहे निराधार,

जसा मी आहे निराधार, आलो तसाच दे उद्धार, की वाहे तुझी रक्तधार, देवाच्या प्रिय कोकरा. आलो तसाच करू काय, व्हायास शुद्ध हीनोपाय, तुझेच रक्त दे सहाय, देवाच्या प्रिय कोकरा. आलो तसाच भ्रांति फार, हावा जगात दुर्निवार, घेरीती संकटे अपार, निवारी, प्रिय कोकरा. आलो तसाच अंधळा, दुःखी, दरिद्री, दुबळा, साठा तुझाच सगळा, पुरीव, प्रिय कोकरा. अशाच तू स्वीकारिशी, क्षमा सप्रेम करिशी, की बोलणे न मोडिशी, देवाच्या प्रिय कोकरा. तुझ्या प्रेमेच जिंकिले, या हृदयास चेचिले, आता मी सर्व सोपिले, तुला, हे प्रिय कोकरा

माझा येशु

माझा येशु मला प्रिय फार ह्या जीवनात तोच आधार आपत्तीत विपतीत ह्या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार (x2) हा जीवन प्रवास कठीण, येते अनेक प्रतिकूल क्षण दिवसा मेध स्तंभ, रात्री अग्नी स्तंभ, माझा वाटाड्या प्रति दिन तो आधी व अंत आहे, हृदयी आनंदाचा झरणा आहे दुःख येता क्षणी, अश्रू पुसतो क्षणीच, माझा प्रतिदिन भार आहे माझ्या येशु ची अपरंपार प्रीती, मला नाही कशाची भीती क्लेश संकट मरण, नग्नता उपोषण, ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती माझा येशु मला प्रिय फार ह्या जीवनात तोच आधार आपत्तीत विपतीत ह्या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार तो कधी न मला सोडणार

अवर्णित क्रिस्चियन सॉन्ग

तेरी स्तुति प्रशंसा हो , तेरी हर पल महिमा हो - x2 तू अवर्णित है , तू सुंदर है , मेरा पेहला पेहला प्यार है - x2 तेरी स्तुति प्रशंसा हो , तेरी हर पल महिमा हो - x2 मेरी निराशाओ में  मेरी आशा बना तू  मेरी खामोशियों को  समझा तूने प्रभु  x2  तू अवर्णित है , तू सुंदर है , मेरा पेहला पेहला प्यार है - x2 तेरी स्तुति प्रशंसा हो , तेरी हर पल महिमा हो - x2 दिल की गेहराइयो में  बस्ता तू ही प्रभु  तेरी इच्छाओ को में  पूरा करता चलु  दिल की गेहराइयो में  बस्ता तू ही येशु  तेरी इच्छाओ को में  पूरा करता चलु  तू अवर्णित है , तू सुंदर है , मेरा पेहला पेहला प्यार है - x2 तेरी स्तुति प्रशंसा हो , तेरी हर पल महिमा हो - x2

पतिता, ये चल शुचिं व्हायाला

१ पतिता, ये चल शुचिं व्हायाला, प्रभु येशुपदास धरीं, अधसिंधूमधुनि तारायाला प्रभु येशु कृपाच तरी धु. प्रभुच्या... प्रभुच्या... प्रभुच्या धर वंद्य पदा जगदुद्घारक गुरूराजाच्या न दुजा पथ मुक्तिपदा २ प्रभु येशु क्षितीवरि आला या, बघ तोचि समर्थ सखा, अधपाशा झडकरी तोडाया तुज देईल नित्य सुखा ३ म्हणवी तो पतितसखा, देई अधमुक्ति विनम्र जनां म्हणुनी तू शरण तया जाई प्रभु देईल शांति मना ४ मनुजांच्या हरि अवघ्या तापा प्रणतीं करूणा करितो , प्रभुपाशी चल त्यजुनी पापा शरणगततारक तो पंडिता रमाबाई

कोण मित्र येशुवाणी

     प्रिय मित्र येशू १ कोण मित्र येशुवाणी, सारे ओझे वाहाया ?    सर्व दुःखे तो ऐकूनी, साह्य करि सोसाया;    त्याकडे कधी न जातां, आम्ही अवमानितो    शांती खरी हरवुनी, शोक किती करितो | २ मोह असले कि चिंता, कांहि दिसे त्रासाया,    धैर्य नच सुटू देतां जा प्रभुला सांगाया    सर्व दुबळ्यांस पाहे, चित्तवृत्ति जाणतो    मित्र प्रिय असा आहे, हात धरी म्हणतो | ३ कष्टि जरी श्रमलेले, खांब जड वाहाया,    त्यासही उपाय केले, जा प्रभूला सांगाया    मित्र जरी तुच्छ मानी, जा प्रभूला सांगाया    तोचि सखा स्वर्गाहूनी, सिद्ध अंगीकाराया | मेरी इ. बिसल