Posts

Showing posts from December, 2023

तन मन धन, प्रभू, तव चरणी

तन मन धन, प्रभू, तव चरणी तन मन धन, प्रभू, तव चरणी सकल तुझे हे तूचि दिलेसी अघटित तव करणी तन मन धन, प्रभू, तव चरणी माझे हे ते मीच मिळविले समजतसे अभिमाने पूर्वी आता खेद मनी तन मन धन, प्रभू, तव चरणी मी मम ज्या कन्या सुत हे दास तुझ्या चरणांचे सारे प्रियकर तूचि धनी तन मन धन, प्रभू, तव चरणी बेत विचारहि, हर मम करणे अवलंबे इच्छेवर तव बा करितो मनधरणी. तन मन धन, प्रभू, तव चरणी वाट, खरेपण, जीवन मम तू शरणागत मी पतित तुला गा जय दे भावतरणी. तन मन धन, प्रभू, तव चरणी