हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो
हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो, । माझा आत्मा येशुकडे पाहात रहातो, ॥१॥ येशू तारितो हो मला येशु तारितो, यामुळेंच माझा जीव बहु आनंदतो ॥२॥ प्रेम दावितो हो, येशु प्रेम दावितो । प्रेमानेंच लहान थोरा तो बोलावितो. ॥३॥ प्रिय वाटतो हो, येशू प्रिय वाटतो, । माझे तन, मन, धन त्यास अर्पितो. ॥४॥